Sandip Shelke : “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” म्हणत ठाकरेंचा सेनापती काँग्रेसमध्ये!

uddhav-thackeray-shivsena-leader-sandip-shelke-joins-congress-harshwardhan-sapkal : उद्धवसेनेला बुलढाण्यात मोठा धक्का; संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह प्रवेश

Buldhana जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रवक्ते सचिन सावंत तसेच अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून संदीप शेळके उद्धवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि त्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धवसेनेला जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dr. Nitin Raut : नागपूर ५० लाखांचे शहर, सहा मतदारसंघ आणि तहसील कार्यालय एकच का?

लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘वन बुलढाणा मिशन’ मोहिमेद्वारे शेळके यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या पक्षांतरामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra budget session : याच अधिवेशनात मिळणार नागपूरकरांना मोठा दिलासा, एनआयटीचे सर्व भूखंड फ्री होल्ड होणार

दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करताना संदीप शेळके यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसची वाट निवडल्याचे सांगितले. काँग्रेस हा शोषित-वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष असून संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या विचारधारेतून आपण पक्षात प्रवेश केला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षासाठी झोकून काम करण्याचे आश्वासन देत त्यांनी “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” असा नारा दिला.