व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक

BJP demands an Atrocity case be filed against Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

Buldhana आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. यासंदर्भात ८ एप्रिल २०२६ रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून तातडीच्या कारवाईची मागणी केली.

भाजपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. गायकवाड यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर खालच्या पातळीची भाषा वापरत आरोप केले. याशिवाय आदिवासी आश्रम शाळेतील मुलींबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांमुळे संबंधित विद्यार्थिनींचे चारित्र्यहनन आणि सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

Deulgao raja APMC : सभापती, उपसभापती आणि संचालकांचा राजीनामा, बाजार समितीत चाललय काय?

कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत तक्रार नसताना अशा स्वरूपाचे आरोप सार्वजनिकरीत्या केल्याने संबंधित मुलींच्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे आदिवासी समाजात आश्रम शाळांबाबत अविश्वास आणि गैरसमज पसरू शकतात, अशीही भीती व्यक्त निवेदनात व्यक्त केली आहे.

भाजपने पुढे आरोप केला की, आमदार गायकवाड यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजप नेत्यांबाबतही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या अशा पुनरावृत्ती होत असलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण दूषित होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे यापूर्वीही राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली होती.

Dilip Sananda : सानंदा म्हणतात, आकाश फुंडकरांनी हे काम करावे!

आदिवासी मुलींबाबतचे कथित वक्तव्य हा गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचा विषय असल्याने त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

error: Content is protected !!