व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव द्या !

Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव द्या !

MLA Sanjay Gaikwad demands that Buldhana district be named ‘Jijaunagar’ : मॉ जीजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान राखण्यासाठी आमदार संजय गायकवाडांची ठाम मागणी

Buldhana : बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून जिजाऊनगर करण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत केली. या जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान राखण्यासाठी जिल्ह्याला जिजाऊनगर नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहात मांडलेल्या भूमिकेनुसार, बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘भिलठाणा’ होते, ज्यावरूनच बुलढाणाचे नामकरण झाले. जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या या भूमीचा सन्मान राखण्यासाठी ‘जिजाऊनगर’ हे नाव उचित असल्याचे त्यांनी सांगितले.

MLA Sanjay Gaikwad : नगरपालिकेच्या शाळांमध्ये आता CBSE पॅटर्न!

सिंचन आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका..
सभागृहात आमदार गायकवाड यांनी सिंचन प्रकल्प, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विस्तार, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या अंमलबजावणीचीदेखील मागणी केली. बुलढाणा नगरपालिकेने सुरू केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या सीबीएसई शाळेचा उल्लेख करत हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

विरोधकांवर टीका आणि सरकारचा बचाव..
विरोधकांकडून सातत्याने सरकारवर आरोप करण्यात येत आहेत, मात्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या तत्वांवर चालणारे आहे. सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम करत आहे, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. तसेच, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!