व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Sanjay Gaikwad-Rahul Bondre : चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप? गायकवाड-बोंद्रे गुफ्तगूने पेटली चर्चा

Sanjay Gaikwad-Rahul Bondre : चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप? गायकवाड-बोंद्रे गुफ्तगूने पेटली चर्चा

new political equations in chikhli after sanjay gaikwad-rahul bondre meet : जत्रेत राजकीय खलबतं; गायकवाड-बोंद्रे भेटीने महाले गटात खळबळ

Chikhli रेणुका माऊलीच्या चैत्रोत्सवाच्या धार्मिक उत्साहासोबतच चिखलीत यंदा राजकीय जत्रेलाही तितकाच जोर चढल्याचे चित्र पाहायला मिळाले. देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने झालेली शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची अनपेक्षित भेट आता तालुक्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे.

चिखली आणि राजकारण हे समीकरण कायमच चर्चेत राहिले आहे. कोणताही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम असो, त्यामागे राजकीय संदेश, गाठीभेटी आणि पुढील डावपेचांची चाहूल असतेच. यावेळीही रेणुका यात्रेच्या निमित्ताने तेच चित्र दिसून आले. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिखलीत आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा सक्रिय हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

पालिका निवडणुकीनंतर काहीसा शांत झालेला हा राजकीय पट आता पुन्हा तापू लागला आहे. विशेष म्हणजे, भाजप आमदार श्वेता महाले यांच्याविरोधातील भूमिका गायकवाडांनी पुन्हा आक्रमक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शिंदेसेनेत संभाव्य पक्षप्रवेशाच्या हालचालींना आधीच हवा मिळालेली असताना, गायकवाडांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली.

Nashik crime news : फिर्यादीच निघाला आरोपी, नोकरीच्या आमिषाने महिलांचे शोषण

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि चिखलीतील भाजपविरोधी समीकरण यावर रणनीती आखली गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भेटीने विशेषतः आमदार श्वेता महाले यांच्या राजकीय गोटात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. कारण, बोंद्रे आणि महाले यांच्यातील जुना राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोन वेळा बोंद्रे यांना पराभूत करत महाले यांनी चिखलीत स्वतःचे मजबूत अस्तित्व सिद्ध केले आहे.

त्यामुळे गायकवाड-बोंद्रे समीकरण प्रत्यक्षात आकार घेत असल्यास ते महाले गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आमदार श्वेता महाले यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने मित्रपक्षातील अंतर्गत विसंवाद अधिक स्पष्ट झाल्याचे चित्र समोर आले. एकीकडे गायकवाड-बोंद्रे भेटीची चर्चा आणि दुसरीकडे जाधव-महाले यांची मंचावरील जवळीक यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

Car accident : भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

राहुल बोंद्रे यांनी यापूर्वी आपण ‘नॉट फॉर सेल’ असल्याची स्पष्ट भूमिका घेतली असली, तरी राजकारणात परिस्थिती आणि समीकरणे क्षणाक्षणाला बदलतात, हे चिखलीच्या या घडामोडींनी पुन्हा अधोरेखित केले आहे. जिल्ह्याच्या सांस्कृतिक राजधानीत सुरू असलेली ही हालचाल आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!