Breaking

Sanjay Gaikwad : वाहन चांगले असेल तर बंदी कशाला?

 

Cancel the decision to ban vehicles over 15 years old : १५ वर्षांवरील वाहनांबाबत आमदार गायकवाड यांचे मंत्र्यांना पत्र

Buldhana शासनाने १५ वर्षावरील वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात अनेक वाहने १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या असल्या तरी त्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करून ७० हजार रुपयांचा दंड लावणे वाहनमालकांना परवडणारे नाही. त्यामुळे १५ वर्षावरील वाहने नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी करावा किंवा दंड न आकारण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक transport Pratap Sarnaik यांच्याकडे केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार काळी-पिवळी वाहने किंवा इतर वाहने चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा वाहनांवर बंदी घालण्याचा शासनाचा निर्णय हा या लोकांसाठी आर्थिक संकट निर्माण करणारा ठरेल. जरी वाहने १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या असल्या तरी काही वाहनांची स्थिती चांगली आहे.

MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

बुलढाणा जिल्ह्यात १५ वर्षांवरील वाहनांची पासिंग होत नाही. मात्र, शेजारील जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अशा वाहनांना पासिंग दिली जाते व त्यांना मुदतवाढ मिळते. त्यामुळे शासनालाही महसूल मिळतो. त्यामुळे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही अशा वाहनांची पासिंग करावी, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली.

MLA Sanjay Gaikwad : दाेन हजार रुपयांवर मतदार भाळले; म्हणाले, तुमच्यापेक्षा..

 

वाहनचालक व मालक यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने १५ वर्षावरील वाहनांवर ७० हजार रुपयांचा दंड लावणे अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ निर्णय घेऊन या वाहनांना नियमित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. गायकवाड यांनी केली.