Destitute people lost their ‘Aadhaar’ due to technical difficulties in Wardha district : ९ हजार ५१८ लाभार्थी वेतनाच्या लाभापासून वंचित
Wardha : निराधारांना स्वाभिमानाने जगता यावे, त्यांच्या उतरत्या काळात एक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने निराधार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दरमहा १ हजार ५०० रुपये निराधारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. याच्याच भरवशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु शासनाने डिसेंबर २०२४ पासून सर्व निराधार लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. पण बहुतांश लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने सध्या शासनाचे डीबीटी पेमेंट फेल ठरले आहे.
तांत्रिक अडचणीमुळे निराधारांना पंधराशे रुपयांचा आधारही मिळालेला नाही. वर्धा जिल्ह्यात ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या ७६ हजार ४६७ लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलवर नोंदविण्यात आले. ६ हजार ६२२ लाभार्थ्यांची मात्र डीबीटी पोर्टलवर नोंदणी होऊ शकली नाही. इतर लाभार्थ्यांचा प्रशासन शोध घेत असून, ज्यांचा शोध लागलेला नाही. ते मयत किंवा गाव सोडून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana : निराधारांना मिळालाच नाही आधार!
डिसेंबर व जानेवारीचे अनुदान राज्य शासनाद्वारे थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. ६१ हजार ८ लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीपणे अनुदानाची रक्कम जमा झाली. असे असले तरी ९ हजार ५१८ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम अद्याप जमा होऊ शकली नाही. डायरेक्ट खात्यावर अनुदान हवे असल्यास लाभार्थ्यांचे बँक खाते तत्काळ आधारशी सिडिंग होणे गरजेचे आहे.
Nagpur violence : पोलिस इंटेलिजन्स फेल, फडणवीसांनी राजीनामा द्यावा !
डीबीटी पोर्टलवर नोंद करूनसुद्धा ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही, त्यांनी आपले आधार कार्ड मोबाइल नंबर, पूर्ण नाव, जन्मतारखेसह अपडेट करून बँक खात्याला सिडिंग करून घेणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण ८३ हजार ८९ निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जाती व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांचा समावेश आहे