NCP will challenge Ravi Rana : आमदार संजय खोडके यांच्याकडून स्वबळावर लढण्याचा इशारा
Amravati अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राज्यात महायुती सरकारचा भाग आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत आमदार रवी राणा महायुतीसोबत असल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार संजय खोडके यांनी रविवारी येथे मांडली.
अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीच्या पदवाटपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार खोडके बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीतील भाजप आणि शिंदे गट निवडणुकीसाठी सज्ज आहेत. महायुती एकत्र लढणार की वेगवेगळे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही भाजपसोबत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत लढवली गेल्यास महायुतीशी आमचा ताळमेळ बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे. महापौरही आमचाच असेल,’’ असा दावा आमदार खोडके यांनी केला.
Vidarbha Movement : विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्ध विदर्भ’ मोहीम
पत्रपरिषदेला आमदार सुलभा खोडके, माजी महापौर चरणजीत कौर नंदा, ॲड. किशोर शेळके, ॲड. शोएब खान, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी सभापती मंगेश मनोहरे, अविनाश मार्डीकर, मनीष बजाज, भूषण बनसोड आदी उपस्थित होते.
शासनाने अमरावतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) मंजूर केले आहे. मात्र, बडनेरा परिसरातील ज्या जागेवर हे कॉलेज उभारले जात आहे, ती जागा आरोग्य सुविधांच्या दृष्टीने योग्य नाही. सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेता शासकीय मेडिकल कॉलेज हे अमरावती शहरालगत असावे.
Local Boday Elections : अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ७ जागांची वाढ?
ईर्विन, डफरीन व सुपर हॉस्पिटल दरम्यान ‘कॉरिडोर’ तयार करून तेथेच मेडिकल कॉलेज उभारणे शक्य आहे. शिवाय शिवाजी शिक्षण संस्थेची आठ एकर जागाही या कामासाठी घेता येऊ शकते. आमची ही लढाई आरोग्यहिताची आहे. ती जनतेसाठी आहे आणि ती पूर्ण झालीच पाहिजे. अन्यथा या मेडिकल कॉलेजची जागा बदलण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही आमदार संजय खोडके यांनी स्पष्ट केले.