mla-sanjay-kute-unique-sambal-vadan-at-gondhal-event-khamgaon : डॉ. संजय कुटेंचे ‘संबळ वादन’ सोशल मीडियावर व्हायरल
Khamgao दिल्लीतील राजकीय वजन वाढविण्याच्या प्रयत्नांत सक्रिय असलेले माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी अलीकडे आपल्या राजकीय शैलीत वेगळेपण जपल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ‘भर दे झोली’ हे गाणे सादर करत त्यांनी साधेपणाची झलक दाखवली होती. त्यानंतर आता लहानपणीच्या मित्राच्या मुलीच्या लग्नानिमित्त आयोजित गोंधळाच्या कार्यक्रमात त्यांनी थेट संबळ हाती घेत गोंधळ सादर केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, केवळ औपचारिक सहभाग नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता कुटे यांनी स्वतः संबळ वाजवून पारंपरिक लोकसंस्कृतीशी असलेली आपली नाळ अधोरेखित केली. या कार्यक्रमाची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समर्थकांकडून त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले जात आहे, तर काही राजकीय वर्तुळात याकडे वेगळ्या नजरेनेही पाहिले जात आहे.
Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांना स्पष्ट समज, देवगिरी बंगल्यावर काय घडलं ?
इतिहासाच्या दृष्टीने पाहता, वारकरी परंपरेपासून विविध धार्मिक विधींमध्ये संबळ या लोकवाद्याचा वापर होत आला असून आजही ग्रामीण सांस्कृतिक परंपरेचा तो महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर एका विद्यमान आमदाराने लोकपरंपरेत सहभागी होत संबळ वाजवणे ही दुर्मिळ बाब मानली जात आहे.
या अनोख्या सादरीकरणामुळे डॉ. संजय कुटे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.








