Sanjay Raut ended Shivsena : निरुपम यांची टीका; उबाठाचे अस्तित्व संपल्यानेच राज ठाकरेंना साद
Mumbai महाराष्ट्रासाठी संजय राऊत यांनी काहीही केलं नाही. संजय राऊत म्हणजे घोटाळा करणारा, पैसे खाणारा माणूस असा त्यांचा महाराष्ट्राशी संबध आहे, शरद पवारांचे आणि काँग्रेसचे दलाल बनून तुम्ही शिवसेना पक्ष संपवला, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय?’ असा प्रश्न संजय राऊत यांनी निरुपम यांना केला होता. त्यावा उत्तर देताना ते म्हणाले, ‘माझे आयुष्य महाराष्ट्रात गेले. मी लोकसभेत काँग्रेस पक्षाचा खासदार होतो, असे निरुपम म्हणाले. कोविड काळात गरिबांसाठी वाटलेल्या खिचडीमध्ये तुम्ही घोटाळा केला. तुमचे लहान भाऊ आणि मुलीच्या नावे कंत्राट घेतले. गोरेगावातील मराठी माणसांना बिल्डर बनून तुम्ही घोटाळा केला आणि त्यांना बेघर केले. तुम्ही तुरुंगात गेलात.’
New Education Policy : हिंदी सक्तीच्या निर्णयाची मनसेकडून होळी
उबाठा आणि मनसेमध्ये साद प्रतिसाद नाटक सुरु आहे. मात्र उबाठा गटाकडून यापूर्वी वारंवार मनसेबाबत विखारी टीका करण्यात आली. उबाठा पक्षाचे अस्तित्व संपल्याने आता त्यांना राज ठाकरेंची गरज भासत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. उबाठाने यापूर्वी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचा तपशील निरुपम यांनी सादर केला.
Dr. Pankaj Bhoyar : शिक्षकांना नको मुख्यालयी राहण्याची सक्ती नको
निरुपम म्हणाले की, उबाठाने मनसेवर टीका करताना भाजपची बी टीम नाही तर ढ टीम आहे, अशी टीका केली होती. तसेच मनसे नव्हे तर गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना आहे, असे म्हटले होते. राज ठाकरे भाडोत्री वक्तव्य करतात. जेव्हा भाजपला गरज असते तेव्हा ते अचानक जागे होतात आणि भाजपच्या ताटाखालचे मांजर बनतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. जे स्वत: पक्ष सोडून गेले त्यांनी गद्दारीवर भाष्य करणे म्हणजे मोठा विनोद आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले होते.








