Breaking

Sanjay Puram : कालिमाटीच्या वीज समस्येवर एका दिवसात तोडगा!

 

Kalimati’s electricity problem solved in one day : अनेक महिन्यांपासून नागरिक होते त्रस्त; सिंचनाचाही प्रश्न सुटला

Gondia दीर्घकाळ सुरू असलेल्या वीजपुरवठा समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी हस्तक्षेप केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर तातडीने गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून कालिमाटी गावातील वीजपुरवठ्यात सातत्याने अडथळे येत होते. यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत होता. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नव्हती. अखेर संजय पुराम यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडले.

MLA Sanjay Puram : दलिस वस्तीसाठी विशेष निधी द्या!

वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला. विद्यार्थ्यांना आता नियमित वीज उपलब्ध होऊ लागली. गावातील अनेक दैनंदिन अडचणी दूर झाल्या. यापूर्वीही संजय पुराम यांनी अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती दिली आहे. कालिमाटीतील वीजपुरवठा पूर्ववत करून त्यांनी पुन्हा एकदा लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रत्यय दिला आहे. “जनतेच्या समस्या सोडवणे माझे कर्तव्य आहे. लोकांच्या सहकार्याने आम्ही आणखी विकासकामे करू, असे संजय पुराम यांनी सांगितले.