Breaking

Sanjay Raimulkar Siddharth Kharat : राजकीय वादातून अधिकाऱ्यांना नोटीस!

 

Notice to officer for not inviting sitting MLA : आमदारांना निमंत्रणच नाही; विकासकामांच्या भुमिपूजनावरून पेटले रण

Buldhana मेहकर मतदारसंघात सध्या माजी आमदार डाॅ. संजय रायमुलकर यांनी विकास कामांचे भूमीपूजन करण्याचा सपाटाच लावला आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यक्रमाला विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांना डावलण्यात येत आहे. मेहकर पंचायत समितींतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पांगरखेड येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलेच नाही. आणि ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आटोपण्यात आले. आता या राजकीय वादाचा फटका अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

या प्रकारामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांनी शासन निर्णयानुसार पांगरखेड येथील ग्रामपंचायत अधिकारी सागर डी. काळे यांना कारणे दाखवा नोटीस शुक्रवारी बजावली आहे. शासकीय कार्यक्रम समारंभाला विधीमंडळ सदस्य, संसद सदस्यांना आमंत्रित करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार शासकीय लोकोपयोगी विकासात्मक कामाच्या भूमिपूजनाच्या, पायाभरणीच्या, शुभारंभाच्या, उद्घाटनाच्या आदी संदर्भातील कार्यक्रमांत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असतो.

Central Government : अकोल्यातील पार्सल थेट पोहोचले अमेरिकेत!

अशा कार्यक्रमांच्या वेळी कार्यक्षेत्रातील सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, महोदयांना योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करणे गरजेचे असते. ते नमूद असताना सुद्धा आपण मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना आमंत्रित केले नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी असल्याचे नाेटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यावर खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

Hair loss disease : चर्चा, बैठकांमध्ये केस गळतीचा लागेना सोक्षमोक्ष !

आदर्श ग्राम आले चर्चेत
राज्यात आदर्श ग्राम म्हणून पुरस्कृत झालेल्या मेहकर तालुक्यातील पांगरखेड गाव पुन्हा चर्चेत आले आहे. माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात भूमिपूजन समारंभासाठी विद्यमान आमदारांना डावलले, अशी तक्रार प्राप्त झाल्याने पांगरखेड ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या नोटीसनंतर आजी-माजी आमदारांच्या जात्यात कर्मचारी भरडल्याची चर्चा रंगली आहे.