Agricultural exhibition like Baramati will be held in Yavatmal : पालकमंत्री संजय राठोड यांना विश्वास, कृषी महोत्सवात साधला संवाद
Yavatmal मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहताना मला आनंद होतो. येत्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारामतीच्या धरतीवर कृषि प्रदर्शन भरविण्यात येईल असा शब्द पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला.
समता मैदानात आयोजित पाच दिवशीय कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांसाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्या मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने देखील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजना राबविण्यात येतात, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली.
Sexual Harassment of Women at Workplace : वर्धा जिल्ह्यातील ४३३ कार्यालयांमध्ये समिती!
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पाणी, वीज, उत्तम दर्जाचे बियाणे व चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यांना या गोष्टी मिळाल्या तर स्वत:च आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करतील. यासाठी शासन सातत्याने आणि प्राधान्याने काम करत आहे. मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले.
जिल्ह्यातील 600 हेक्टरच्या खालील सर्व तलावांमधून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कालव्यांऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा नवीन प्रयोग आपण जिल्ह्यात राबवत आहोत. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात एक हजार कोटींची जलसंधारणाची कामे केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कृषि महोत्सवाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान आणि माहितीचे आदान प्रदान होते. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे. आपल्या शेतात अधिक उत्पन्न घेण्यासाठी काय केले पाहिजे, याची माहिती देखील या महोत्सवातून शेतकऱ्यांनी घेऊन शेतात नवीन प्रयोग करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.