..and the Guardian Minister was overwhelmed by ‘these’ activities of the school : वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला
Yavatmal : उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. शाळेत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. या शाळेला पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. या भेटीत शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांनी पालकमंत्री अक्षरशः भारावले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा नागापूरसारखी असावी, अशा शब्दांत त्यांनी शाळेचे कौतूक केले.
या भेटीत त्यांच्यासोबत आमदार किसन वानखेडे, हादगावचे आमदार बापुराव कदम, माजी आमदार विजय खडसे, सरपंच गोदाजी जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, चितांगराव कदम, नितीन भुतडा, हरिहर लिंगनवार, पराग पिंगळे आदी उपस्थित होते.
Randhir Sawarkar : ‘स्वारगेट’ नंतर आमदारांनी घेतली अकोला बस स्थानकांची झाडाझडती!
नागापूर येथील शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमासह डिजिटल वर्गखोल्या, स्क्रीनसह डिजिटल प्रोजेक्टर रुम, संगणक प्रयोगशाळा, ई-लर्निंग सुविधा, सप्तरंगी परिपाठ, किलबिल वाचनालय, सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही, भौतिक सुविधांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगमंच, मध्यान्ह भोजनासाठी शेड, सुसज्ज प्रसाधनगृह, सौरऊर्जा विद्युत पँनल, संगीत व क्रीडा विषयक साहित्य, हँन्डवाँश स्टेशन, मैदानी खेळाचे साहित्य, प्रथमोपचार सुविधा, शुद्ध पेयजल, सोलर एनर्जी पंप, सोलर वाँटर हिटर यासह विविध सहशालेय उपक्रम शाळेत राबविले जातात.
पालकमंत्र्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर डिजिटल वर्गखोली, संगणक लँब, मुख्याध्यापकांचा आगळावेगळा कक्ष, खेळाच्या सुविधांची पाहणी केली. शिक्षकांशी संवाद साधला व विविध उपक्रमांचे कौतूक केले. यावेळी शाळेतील डिजिटल बोर्डचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, जिल्हास्तरीय कबबुलबुल मेळाव्यात सहभागी पथकातील विद्यार्थी व थाळीफेक मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त तरोडा शाळेतील तनया चव्हाण या विद्यार्थीनीचा पालकमंत्र्यांनी यावेळी सत्कार केला.
Eknath Shinde : कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही!
रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन..
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नागापूर जोडरस्ता बारा जोडरस्त्यास जोडणाऱ्या मार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाची किंमत १ कोटी आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या गांडूळखत निर्मिती शेडची पाहणी देखील त्यांनी केली.
व्यायामशाळा व आपला दवाखान्याचे उद्घाटन..
नागापूर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.