Chandrashekhar Bawankule said that Sharad Pawar was the one who convinced the leaders of Maha Vikas Aghadi : आता त्यांचे नेते ऐकतील असा विश्वास आहे
Nagpur : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम व काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सैनिकांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आपले सैनिक देशाचे रक्षण करत आहेत आणि हे लोक त्यावर राजकारण करत आहेत. त्यांना आता शरद पवारांनी सुचना दिलेल्या आहेत. ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या सुचना महाविकास आघाडीचे लोक ऐकतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नागपुरात आज (ता. १९) महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नागपुरातील पाणी टंचाईसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, नागपूर शहर आणि जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये. पाणी चोरी आणि ३० टक्के असलेले लिकेजेस दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सुचना दिल्या आहेत. एक महिन्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्याही सुचना दिल्या आहेत.
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चा जल्लोष नको, संयम बाळगावा !
बर्डी बाजार परिसरात हॉकर्सची समस्या उद्भवली आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन नागपूरच्या संदर्भातही आज चर्चा झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून योजना तयार होतील, त्या आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Revenue Department : ‘जिवंत सातबारा’तून पाच लाख नोंदी करण्याचा विक्रम !
खरीपामध्ये बोगस बियाणांची समस्या तोंड वर काढत आहे. यासंदर्भात विचारले असता, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये बोगस बियाणे आले तर थेट फौजदारी गुन्हे दाखल होतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बोगस बी बियाणे मिळणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेत आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.