Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांनी गुजराती शाकाहारी ब्रँड प्यायली आहे

Allegation that the BJP lacks an ideological foundation : संजय राऊतांची बोचरी टीका, भाजपला वैचारिक आधार नसल्याचा आरोप

Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने एमआयएमसोबत युती केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत आण महेश मांजरेकर यांनी घेतली. ही मुलाखत गुरुवार ०८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत राऊत यांनी फडणवीस आणि मोदींवर सडकून टिका केली. राऊत म्हणाले की, “भाजपच्या या डोलार्‍याला भक्कम आधार नाही. भक्कम वैचारिक आधार असता तर एमआयएमशी युती केली नसती. काँसशी युती केली नसती.”

BMC Elections : राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंसोबत, पाठिंबा जाहीर

या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, “भाजपचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे.” यास दुजोरा देत राऊत म्हणाले, “सध्याचा भाजप हा मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा आहे, यात राज ठाकरे काय चुकीचं बोलले? आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक राजकारणात स्वतः मोदी डगमगलेले आहेत. त्यामुळे हा डोलारा कधीही कोसळून पडेल आणि तो कोसळण्याची वाट देशाची जनता पाहतेय.”

राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, “देवेंद्र फडणवीस गुजरातची शाकाहारी ब्रँड प्यायले आहेत.” आता पाहायचे आहे की फडणवीस राऊतांच्या टिकेला कशाप्रकारे उत्तर देणार आहेत. राऊत पुढे म्हणाले, “शिवसेनाप्रमुखानंतर त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही निवडणुका लढलेलो आहोत आणि चांगल्या प्रकारे जिंकलो आहोत. आमच्यासोबत तुम्हीही त्या सत्तेत सहभागी झाला आहात. आज जर मोदी ब्रँड असेल असे तुम्ही म्हणताय, मग मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणत्या ब्रँड ब्रँडी पिणार आहात?” असा खोचक सवाल राऊतांनी विचारला.

BMC Elections : एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र येणार?

सध्या ही मुलाखत तुफान गाजत असून सगळीकडे चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजप या मुलाखतीत झालेल्या टिकेला कशाप्रकारे उत्तर देईल हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. भाजपमध्ये साटम, नितेश राणे, पडळकर इत्यादी आक्रमक नेते आहेत. त्यांच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.