Sanjay Raut alleges that Eknath Shinde is doing everything out of fear : एकनाथ शिंदे सर्वकाही भीतीपोटी करत आहेत
Mumbai : एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोक अशिक्षित आहेत. सभागृहात माझ्या भाषणात मी काय सांगितले होते, हे त्यांनी नीट ऐकलेले नाही, असा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरदेखील हल्लाबोल केला.
आज (५ मार्च) माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, हे लोक जनाब-जनाब करून राहिले. पण असली जनाब अमित शाह आणि नरेंद्र मिया मोदी आहेत. तेच असली जनाब आहेत. मी भाषण केले, तेव्हा हे लोक बहिरे झाले होते का? आता हे लोक मुसलमानांची येवढी वकीली करत आहेत की, बॅरीस्टर मोहम्मद अली जिनांनीही येवढी चिंता मुसलमानांची केली नव्हती. आता हे मुलमानांचे मसिहा असल्यासारखे वागत आहेत.
Devendra Fadanvis : आग्रह असणे चुकीचे नाही, मात्र कायदा हाती घेऊ नका!
जिनांचा आत्मा शिरला..
जिनांचा आत्मा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अंगात शिरला आहे. जनाब मोदी आणि जनाब शाह त्या सिंडीकेटचे लोक आहे. एकनाथ शिंदे वगैरे त्यांचे चेलेचपाटे आहेत. शिंदे भीतीपोटी जगत आहेत. आता काही केले तर आपल्याला पकडून ईडी, सीबीआयच्या जेलमध्ये टाकून देतील, ही भीती शिंदे आणि त्यांच्या चेलेचपाट्यांना आहे. अशा लोकांनी आमच्यासारख्या लोकांसोबत तोंड वाजवू नये. कारण त्यांच्या फाईल अद्याप बंद झालेल्या नाहीत, असे म्हणत खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला चढवला.
MLA Nitin Deshmukh : शिवसेना जिल्हाप्रमुखांसाठी आमदार उतरले मैदानात !
मोदी ट्विटर पंतप्रधान..
आम्ही आमचे काम केले. आम्हाला जो निर्णय घ्यायचा होता, तो आम्ही घेतला आहे. सध्या मोदी बॅंकॉकमध्ये आहेत. तेथे त्यांच्या मेंदुचा मसाज सुरू आहे. तेथे जाऊन लोकांना फ्रेश वाटते. २६ टक्के टेरीफ लावले आहे. येथील रुपया केवळ पडला नाही तर पडून मेला आहे. बॅंकॉकमध्ये कोणती आफत आली की, मोदी तेथे गेले आणि तेथून ट्विट करत आहेत. ते केवळ ट्विटर पंतप्रधान आहेत. अमेरीकेचा टेरीफ हल्ला गंभीर आहे. आता आपल्या रोजगारावरही हल्ला होणार आहे, अशी भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.