Sanjay Raut claims, in Delhi discission for stop influence of ‘Thackeray brand’ : ‘ ठाकरे ब्रँड’ चा प्रभाव रोखण्यासाठी, दिल्लीत खलबते संजय राऊत यांचा दावा
Mumbai : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची सगळ्यात मोठी भीती एकनाथ शिंदे यांना आहे. ठाकरे ब्रँड’ चा प्रभाव रोखण्यासाठी, दिल्लीत खलबते सुरू आहेत. ‘ मी माझ्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा!’ असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे केंद्रीय मंत्री, अमित शहा यांना दिला आहे. असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे,
मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील, असं राऊत यांनी त्यांच्या ‘ रोखठोक’ या सदरात म्हटलं आहे.
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘प्राचार्य म्हणजे नेतृत्वाची परीक्षा’
मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल. याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होउढन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले. महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही. यावर अमित शहा यांनी विचारले, काय करायचे? त्यावर शिंदे म्हणाले, ‘ मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.’ शहा आणि शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात आहे, असा दावाb संजय राऊत यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतही दिल्लीत अमित शाह आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गटाच्या काही आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी, महापालिका निवडणुकीपर्यंत हे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. महायुती एकसंध आहे, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते.
Vidarbha Farmers : शेतकरी चढला टॉवरवर; दागिने विकून पैसे भरले, पण सौर पंप लागला नाही!
राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 जुलै रोजी संध्याकाळी अचानक दिल्लीत गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी शहा आणि शिंदे यांच्यात कोणती राजकीय खलबते झाली, याबाबत हा खळबळजनक दावा केला आहे.








