Sanjay Raut is a burning wood, says MP Naresh Mhaske : बंगालमधील हिंदुवर अत्याचार होताना उबाठा गप्प का?
Thane : पश्चिम बंगालमधील हिंसाचारात हिंदुंची हत्या झाली आहे. तेथील हिंदू कुटुंबे घरदार सोडून पळून जात आहेत. मुस्लिम मतांसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बंगालमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. यावर उद्धव ठाकरे गप्प का, असा सवालही त्यांनी केला.
ठाण्यात आज (१६ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार म्हस्के बोलत होते. यावेळी त्यांनी उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी खरी शिवसेना कोण पुढे नेत आहेत, यावर शिक्कामोर्तब केले.
आज एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बाळासाहेबांना भाषण करायला लावताय, इतकी वाईट वेळ तुमच्यावर आली, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी केली. त्यांची अवस्था खचलेले मन, खचलेला पक्ष, खचलेली वृत्ती आणि खचलेला नेता, अशी झाली आहे. संजय राऊत हे जळकं लाकूड आहे, अधुनमधून राऊत यांच्यातून धूर निघत असतो, असा खरमरीत टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
Mangalprabhat Lodha : अंत्योदयच्या माध्यमातूनच होईल लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती !
हिंदुंवरील अत्याचाराबाबत उबाठा गप्प का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी केला. शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. तेथील पिडित हिंदु कुटुंबियांना मदत करणार असल्याचे ते म्हणाले. खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजुर केल्यानंतर बंगालमध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांनी हिंदुं समाजावर हल्ले सुरु केले आहेत.
मुर्शिदाबादमध्ये समाजकंटकांनी पोलीसांसमोरच हिंदू कुटुंबाच्या घरात घुसून ठार मारले. हिंदु कुटुंबियांची मालमत्तेची वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदुंना संरक्षण करण्यास सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे तेथील सरकार बरखास्त करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.
Chandrakantdada Patil : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू !
मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी लाचार झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका म्हस्के यांनी केली. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाप्रमाणे ममता बॅनर्जी वागत आहेत. त्यांचे नाव बदलून ममता राणा करावे, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केला. ते पुढे म्हणाले की स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणारे आणि मातोश्रीवर ममता बॅनर्जी यांना चहापानाला बोलावणारे उद्धव ठाकरे बंगालमधील हिंदुंवरील अत्याचाराचा निषेध करतील का?
यापूर्वीही बंगालमध्ये हिंदुंवर सातत्याने अत्याचार झाले आहेत. लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकीत संपूर्ण बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. सन २०१८ मध्ये रामनवमीच्या दिवशी राणीगंज शहरात दंगल घडवण्यात आली होती. मुस्लिम तुष्टीकरणाच्या नादात ममता बॅनर्जी यांनी घटनेची मोडतोड केली असल्याचा आरोप खासदार म्हस्के यांनी केला.
Harshawardhan Sapkal : राज्य टिकवण्यासाठी दंगली, पण आपला मार्ग सद्भावनेचा !
काँग्रेस सरकारच्या काळात ज्या प्रकारे काश्मीरमधून हिंदु कुटुबांना पलायन करावे लागले होते, तशाच प्रकारे आता बंगालमध्ये हिंदु कुटुंबांना आपलं घरदार सोडून पळावे लागत आहे. मात्र ममतांना घाबरुन इंडि अलायन्सचे नेते राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, एम.के स्टॅलिन यांनी बंगालच्या हिंसाचारावर सोयीस्कर मौन बाळगले आहे, अशी टीका खासदार म्हस्के यांनी यावेळी केली.








