Breaking

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत !

Sanjay Raut targets the Chief Minister, calling his neighbors duplicates : ‘ त्यांच्या शेजारी डुप्लीकेट लोकं’ म्हणत संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सभागृहात बोलताना, तुम्हाला या बाजूने यायचं असेल तर बघा, इकडे यायला स्कोप आहे, अशी ऑफर दिली होती. यावर सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यांच्या शेजारी सध्या डुप्लिकेट लोक बसलेले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंना केलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी एकनाथ शिंदेंना डुप्लीकेट शिवसेना म्हणत टोला लगावला. फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या मारण्यात पटाईत आहेत. ते डुप्लिकेट लोकांसोबत बसले आहेत, त्यांनी खऱ्या लोकांसोबत बसायचं याचा विचार आधी करावा असा सल्ला देतानाच त्यांनी नाव न घेताच एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला. फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यानुसार त्यांनी टोमणा मारला आसेल पण ते एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. असे म्हणले आहे.

Ban on artificial flowers : कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी येणार!

शिवसेना हे नाव आणि चिन्ह यासदंर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना लढा देत आहे. आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून जे डुप्लीकेट लोकं बसले आहेत त्यांचा विचार आधी करावा, की डुप्लीकेट लोकं ठेवायची की असली लोकं सोबत ठेवायची, सध्या तरी त्यांचा कारभार डुप्लीकेट लोकांना घेऊन चाललेला आहे, नाव न घेता राऊतांनी हा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. फडणवीसांची ऑफर अजिबात गांभीर्याने घेत नाही, सिनेमात टाळीची वाक्य असतात तसंच हे वाक्य आहे, असंही राऊत म्हणाले.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘जल जीवन मिशन’ची चंद्रपूरसह राज्यातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा

सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लीकेट लोकांसोबत सत्ता भोगत आहेत. डुप्लीकेट शिवसेना , डुप्लीकेट राष्ट्रवादी… त्यांना कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असं असताना तुम्ही मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देताय ही वैचारिक दिवाळखोरी आहे अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवरही टीकास्त्र सोडलं उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यत आहे. तशी आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केलं.

Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?

काल काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांचा फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे इंडिया ब्लॉकमधील अनेक सदस्य हे अस्वस्थ आहेत. या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबाबत एक दिशा ठरवणं गरजेचं आहे. अशी भावना उद्धव ठाकरेंनी मांडल्यानंतर दिल्लीत या बैठकीबाबत हालचाली सुरू आहे, तारखेसंदर्भातही चर्चा होईल असं राऊत म्हणाले.

_____