We have always followed tradition and culture in Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली आहे
Nagpur Sanjay Raut News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत फटकळपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणूक काळात तर ते महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडले होते. निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला. तर महायुतीने ‘न भूतो..’ असे यश मिळवले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे गटाकडून फडणवीसांचा विरोध कमी कमी झालेला पहायला मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंसह फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
आता संजय राऊतही फडणवीसांबद्दल काहीसे मवाळ झाल्याचे बघायला मिळाले. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली आहे. सरकार जे चांगले काम करते, विरोधी पक्षाने त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जे काम सुरू केले, त्याची आम्ही स्तुती केली. व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केले पाहिजे, अशी परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे.
Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज?
‘तो’ प्रकार चुकीचाच
मागील काळात ती परंपरा दुर्दैवाने भाजपने मोडली होती, हे मान्य केलेच पाहिजे. आपल्या राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले. ईडी सीबीआयचा गैरवापर केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुरूंगात टाकले. हा प्रकार अत्यंत चुकीचा होता, असेही संजय राऊत म्हणाले.
कोण कुठे जाणार, कोण कुठून येणार, हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका, आयडिओलॉजी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे. ते कुठल्या आयडिओलॉजीमध्ये बसते. असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना केला. जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू. मात्र आमचा संघर्ष त्यांच्याशी राहणार जोपर्यंत ते तानाशाही करणार. जोवर तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन सरकार चालवणार, तोपर्यंत आम्ही विरोधात उभे ठाकणार, असेही राऊत म्हणाले.
CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !
आम्ही विश्वासपात्र मित्र होतो, पण..
कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतोच. आम्ही 25 वर्ष मित्रच होतो. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राहिलेले आहेत की, त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही. सेंट्रल एजेंसीचा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात महाराष्ट्रात भाजपने केली. ते आता सुधारणार असतील, पर्यावरणाचे संतुलन साधणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. असे खासदार राऊत यांनी सांगितले.