Breaking

Sanjay Raut : ट्रम्प मोदींचे मित्र पण भारताचे शत्रू, कसे ते संजय राऊतांनी सांगितले !

US President Donald Trump is a friend of Narendra Modi but an enemy of India : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर केली सडेतोड टीका

Mumbai : इराण आणि इस्त्राइलच्या युद्धाने जागतिक राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) केला जात आहे. इराण आणि इस्त्राईल यांच्या युद्धात अमेरिकेने जो सहभाग नोंदवला, तो योग्य नाही, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून सडकून टिका केली आहे.

इराण आणि इस्त्राईल यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर एकावर एक हल्ले केले जात आहेत. आता यामध्ये अमेरिकाही उतरला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा शिवसेनेने निषेध केला आहे. इराणच्या एस्फहान, नतान्झ आणि फोर्डो येथील अणू ऊर्जा केंद्रांवर अमेरिकेच्या सैनिकांनी हल्ला चढवला. त्यामुळे ट्रम्प व त्यांचे समर्थक जगात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण गाझामध्ये इस्तराईलने हल्ला केला. तेथे सरळ सरळ नरसंहारच केला. पण ट्रम्प हा नरसंहार थांबवू शकले नाहीत.

Girish Mahajan : भाजपचा दुपट्टा टाकला होता, असे म्हणत महाजनांचा खडसेंना टोला !

इराण आणि इस्त्राईल यांच्या युद्धात ट्रम्प इस्त्राईलची बाजू घेऊन इराणला धमक्या देत आहेत. भारतावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानलाही ट्रम्प झुकते माप देत आहेत. नाही तर त्यांनी पाकिस्तानी जनरल मुनीरसोबत डिनर डिप्लोमॅसी केली नसती. एकीकडे ट्रम्प हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत. पण दुसरीकडे ते भारतीचे शत्रू असल्याचे दिसत आहे, असे म्हणत सामनाच्या लेखातून आरोप करण्यात आला आहे.