Sanjay Shirsat : शिरसाट म्हणतात, माझ्या विभागाने निधी दिला, पण कौतुक बावनकुळे यांचे

Battle of credit dispute among ministers in mahayuti : महायुतीत नाराजी नाट्य सोबत श्रेय वादही, मुख्यमंत्र्यांनी दिले चोख उत्तर !

Nagpur : महायुतीतील पक्षांमध्ये एकीकडे वेगवेगळ्या मुद्द्यावरून अधून मधून नाराजी नाट्य पाहायला मिळते. त्याचबरोबर आता श्रेय वादावरूनही कुरघोडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. माध्यमांवर व्यक्त होताना तसेच जाहीर कार्यक्रमात एकमेकाला चिमटे काढत हा प्रकार केला जातो हे पाहायला मिळत आहे. आपल्यानंतर दुसरं काही निर्माण होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? असा जाहीर सवालच शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केला आहे, माझ्या विभागाने निधी दिलेल्या कामाचे श्रेय मात्र बावनकुळे आणि विदर्भातील नेत्यांना मिळत आहे अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आणि श्रेयवाद कसा करायचा हे शिकलो असा टोलाही त्यांनी लगावला.

शनिवारी नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात हा प्रकार समोर आला. सर न्यायाधीशांच्या हस्ते विधी महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच महाविद्यालयात शिकलेले आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर नेते एका रूममध्ये बसले होते. तिथे घडलेल्या एका किस्स्याचा संदर्भ शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात दिला.

Hindi Marathi Conspiracy : मनसेकडूनही जय्यत तयारी, लोकलमधून सुरू केला प्रचार !

शिरसाट म्हणाले की, तिथे मुख्यमंत्री फडणवीस पोचले आणि आम्ही बसलो होतो ती खोली पाडण्यात येणार असल्याची माहिती
त्यांनी दिलीसा. आपल्या नंतर इथे दुसरे काही निर्माण होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. नंतर जेव्हा फडणवीस भाषणासाठी उठले तेव्हा त्यांनी सांगितले की, शिरसाट यांनी अर्धसत्य सांगितले आहे. ती रूम पाडली जाणार आहे. मात्र मी हे आकसाने नव्हे तर विधी महाविद्यालयात नवी इमारत तयार करायची आहे. त्या भावनेतून बोललो.

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंची शिवसेना दाखवणार एकीचे बळ !

शिरसाट यांनी आपल्या भाषणात श्रेय वादाबद्दल जे वक्तव्य केले होते. माझ्या विभागाने निधी दिला मात्र त्याचे श्रेय बावनकुळे यांना मिळत आहे असेही ते म्हणाले होते. या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले, आणि नागपुरातील संविधान उद्देशिका पार्कच्या कामासाठी सर्वच विभागाचा निधी वापरण्यात आल्याचे सांगितले.

___