DJs banned, bands be called; Shirsats statement in the news : डीजे बंद, बँड मागवा; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत
Mumbai : राज्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी घातल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी मंडळांना आवाहन केले की, डीजे नको, बाहेरून बँड मागवा. पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे.
त्यांचे हे वक्तव्य चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांच्या खोलीतील नोटांनी भरलेली बॅग दिसलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून राज्यात प्रचंड चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनीच स्वतःवर मिश्कील टोमणा मारत हे वक्तव्य केले.
या विधानातून शिरसाटांनी दोन संदेश दिले. एक म्हणजे डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा बँड – बेंजोचा पर्याय चांगला. आणि राजकारणात पैसा हा कायमच बॅगेत असतो आणि हवे तेव्हा बाहेर येतो. त्यांनी अगदी तिखट शब्दात काही मंडळांच्या हट्टावरही टीका केली डीजेसाठी 10 हजार दिलेत म्हणे, ते गेले तरी चालतील. पण जर एखाद्या मुलाचे कान गेले, एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.
National Education Policy : शैक्षणिक धोरण उपयुक्त, मात्र अंमलबजावणीत अडचणी
दरम्यान, साताऱ्यात कराड शहरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळावर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे. कारण मंडळाने बंदी असूनही महामार्गावर डीजे आणि एलईडीसह मिरवणूक काढली. परिणामी ५-६ तास महामार्गावर जाम झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आपला दौरा रद्द करून मुक्काम बदलावा लागला