Breaking

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांची संपत्ती पाच वर्षात 13 पटींनी वाढली

Income Tax notice to Sanjay shirsat : आयकर विभागाची नोटीस आल्यामुळे चर्चेत आले शिंदे गटाचे मंत्री

Chhatrapati Sambhajinagar : महायुती सरकार मधील एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री, संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. हा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. सत्ताधारी मंत्र्याला नोटीस आल्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसापासून शिरसाट वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. नोटीस आल्यानंतर त्यांच्या संपत्तीत पाचच वर्षात तब्बल 13 टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मूळ शिवसेनेत असलेले संभाजीनगरचे संजय शिरसाट सुरुवाती पासूनच एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ते पक्षाची बाजू लढवत आले. सुरुवातीला त्यांचे मंत्रिपद हुकले त्यावेळी ते मंत्रिपदाची आस लावून बसले होते. दुसऱ्या टर्ममध्ये त्यांची वर्णी लागली. मात्र काही दिवसातच भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या आरोपांनी त्यांना घेरले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांच्या गैरव्यवहाराचे अनेक प्रकार समोर आणले. यावरून मोठा तणावही निर्माण झाला होता. शिरसाट समर्थकांनी मोठा मोर्चा काढत जलील यांच्यावर हल्लाबोल केला.

Sanjay Shirsat : आयकरची नोटीस, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना धक्का

शहरातील हॉटेल वीट्स चा लिलावात संजय शिरसाठ यांनी आपले वजन वापरून, मुलाला अर्ध्यापेक्षा कमी किमती हे हॉटेल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप झाले. शिरसाट यांच्या कडे हे हॉटेल घेण्यासाठी एवढे पैसे कुठून आले ?असे प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या संपत्तीबाबत आयकर विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या. आता त्यांना आपल्या संपत्ती बाबत नोटीस मिळाली आहे. त्यामुळे शिरसाट यांची संपत्ती नेमकी किती? त्यात किती वाढ झाली? हे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार केवळ पाच वर्षातच त्यांच्या संपत्तीत 13 टक्के पेक्षा जास्त ची वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Eknath Shinde : अधिवेशनाच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

विरोधकांनी शिरसाट यांच्यावर व्हिट्स हॉटेलच्या खरेदीवरुन अनेक आरोप केले. बाजारभावानूसार ११० कोटी रुपयांचे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने ६७ कोटी रुपयांना विकत घेण्याची प्रक्रिया केली होती.संजय शिरसाट यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संपत्तीचे विवरणपत्र सादर केले होते. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात एकूण 13 टक्क्यांनी त्यांची संपत्ती वाढल्याचे दिसत होते. शिरसाट यांची जंगम संपत्ती 2019 मध्ये 1.21 कोटी होती. ती आता 2024 मध्ये 13.37 कोटी झाली. त्यांची स्थावर संपत्ती 2019 मध्ये 1.24 कोटी होती, तर 2024 मध्ये ती 19.65 झाली .शिरसाट यांच्याकडे 2024 मध्ये 1.42 कोटी रुपयांचे सोने असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रातून समोर आले आहे.

 

____