Sanskriti Bachao Morcha : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर रणांगणात या

Nilesh Lankas challenge, Rohit Pawars criticism : संस्कृती बचाव मोर्चा, निलेश लंकेंचं आव्हान, रोहित पवारांची ही टीका

Sangli : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला. या मोर्च्यात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी पडळकर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

खासदार निलेश लंके यांनी थेट आव्हान देत म्हटलं “याचा आका एसीत बसतो, त्यालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर रणांगणात या. आधी दोन पोलीस घेऊन फिरणारे आता चार पोलीस घेऊन फिरतात. दम असेल तर मैदानात या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या.”

Election of Teacher Constituency : शिक्षण क्षेत्रातील नेते आजमावणार राजकीय भवितव्य!

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही पडळकर आणि भाजपवर टीका करताना टोलेबाजी केली. “गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचं सोने आहे. हा मुद्दा तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा नाही, तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. निनावी जाहिराती देऊन राजकारण करतात” असा आरोप रोहित पवारांनी केला.

Match Controversy : पाकड्यांनी भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याच्या कृतीतून…,

ते म्हणाले, “महामानवांच्या विचारांचा आपण सन्मान करतो, पण त्यांच्या विचारांचं पालन होत नाही. बहुजन समाजातील नेत्यांचा वापर करून पवार कुटुंब आणि पाटील कुटुंबावर हल्ले केले जात आहेत. आम्हाला ईडी किंवा दुसऱ्या कोणत्याही कारवाईची भीती नाही. निवडणुका आल्या की समाजासमाजात तेढ निर्माण करणं, हेच भाजपचं राजकारण आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं.

____