Sant Gadge Baba Amravati University : विद्यार्थी हिताचा विद्यापीठालाच पडला विसर!

41 percent of funds for student welfare schemes have not been spent : योजनांवरील ४१ टक्के निधी अद्याप खर्च न झाल्याचे उघड

Amravati संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थी हिताच्या विविध योजना मंजूर होतात. मात्र त्या अंमलात येत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठ अर्थसंकल्पात मंजूर निधी खर्च करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधीपैकी तब्बल ४१ टक्के निधी खर्चच न झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विविध योजना मंजूर केल्या जातात. त्यांची अंमलबजावणी व लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विद्यार्थी विकास विभागावर असते. मात्र, यामध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थी या योजनांपासून वंचित राहत आहेत.

MLC Dhiraj LIngade : सरकार लाडक्या बहिणींना विसरले!

सिनेट सभागृहात या मुद्द्यावर चर्चा झाली. सिनेट सदस्य डॉ. नितीन टाले यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कडाडून टीका केली. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या योजनांकडे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ‘कमवा आणि शिका योजना’, ‘विद्यार्थिनी बस पास सवलत योजना’, ‘शुद्ध पेयजल योजना’, ‘शिक्षण संरक्षण योजना’, ‘विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती योजना’, ‘विद्यार्थी सुरक्षा विमा योजना’, ‘विद्यार्थी दायित्व योजना’, ‘कौशल्य विकास योजना’ आणि ‘स्व. रामप्रकाश श्यामलाल राठी शिष्यवृत्ती’ यांसारख्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांचे उपोषण; चिखलीत अनोखे आंदोलन

यांसाठी २०२३-२४ या वर्षात विद्यापीठाने ७२ लाख २७ हजार ५०० रुपयांची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी केवळ ४२ लाख ६३ हजार ०१४ रुपये खर्च करण्यात आले. उर्वरित २९ लाख ६४ हजार ४८६ रुपये निधी अखर्चित राहिला आहे.

विशेषतः आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी मोफत बस पास योजना मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५६ हजार ८६० रुपयेच खर्च झाले, तर ४ लाख ४३ हजार १४० रुपये निधी शिल्लक राहिला.