Saroj Patil : अजित पवार वरून कठोर आतून गोड तर रोहित उगवता तारा !

Ajit Pawar is tough from the outside but sweet from the inside, while Rohit is a rising star : रोहितने ‘तो’ गुण शरद पवार यांच्याकडून घेतला

Mumbai : ‘एकदा मी अजित कडे गेले. त्याने विचारलं कशासाठी आलात? मग म्हणाला.. चल दिली तारीख जा आता आत खाऊन घे.’ इतकं फास्ट काम असतं त्याचं. तर.. असा हा अजित वरून नारळासारखा कठोर वाटतो, पण आतून नारळाच्या पाण्यासारखा गोड आहे, असे गौरवोद्गार सरोज पाटील यांनी काढले आहेत. ‘पण, फक्त घाई करू नको बाबा..’, असा सल्लाही त्यांनी अजित दादांना दिला.

सरोज पाटील या शरद पवार यांच्या बहीण आहेत. निवडणुकीच्या काळातही सरोज पाटील घरात स्वस्थ बसून राहात नाहीत, तर अगदी पायाला भिंगरी लाऊन फिरत असतात. अजितचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की, त्याचं आमच्या घरावर खूप प्रेम आहे. पुढे सरोज पाटील म्हणाल्या, येथे मला एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करावासा वाटतो. त्याचा अभिमान वाटतो. खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीट म्हणजे रोहित पवार.

ST income : रक्षाबंधनात एसटीची विक्रमी १३७.३७ कोटींची कमाई !

रोहित आता दमदार भाषणं करायला लागला आहे. असं वाटतंय की, तो एन. डी. पाटील यांची जागा घेतो की काय? लहान वयातही त्याने कामांचा झपाटा सुरू केला आहे. त्याने आपलं वाचनही वाढवलं आहे. हा गुण त्याने शरद पवार यांच्याकडून घेतला, ही चांगली गोष्ट आहे, असेही सरोज पाटील रोहित पवार यांच्याबद्दल म्हणाल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाच्या चर्चा काही काळापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या. तसे सुचक वक्तव्य पवार कुटुंबीयांकडून करण्यात आले होते. नंतर मात्र या चर्चांना विराम मिळाला. त्यात शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी एकाच व्यासपीठावर अजित पवार आणि रोहित पवार यांचे कौतुक केल्यामुळे हे दोन्ही गट एकत्र येतील का, असा प्रश्न पुन्हा चर्चिला जाणार, असं दिसतंय.