Sharad Pawars direct attack, defending the government : शासनाचे संरक्षण, शरद पवारांचा सरकारवर थेट प्रहार
Mumbai : मतदार याद्यांतील अनियमितता आणि निवडणुकीतील कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून आज मुंबईत विरोधकांच्या वतीने “सत्याचा मोर्चा” आयोजित करण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. मोर्चात मतदार याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी आपल्या भाषणात शरद पवार यांनी लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि शासनाच्या भूमिकेवर थेट भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, “देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व नागरिक आज इथे एकत्र आलात. आजचा मोर्चा मला जुन्या काळातील संघर्षांची आठवण करून देतो. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी काळाघोड्याच्या परिसरात असेच विचार मांडणारे मोर्चे निघाले होते. आज पुन्हा आपण एकत्र आलो आहोत, पण या वेळी मुद्दा वेगळा आहे लोकशाही टिकवण्याचा.”
Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?
ते पुढे म्हणाले, “आज आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण फक्त एवढंच सांगतोय की संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला पाहिजे. निवडणुका झाल्या, पण त्या पद्धतीमुळे सामान्य जनतेच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत.”
सोलापूरचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या अनुभवाचा उल्लेख करत पवार म्हणाले, “त्यांनी जे अनुभव सांगितले, त्याचा गैरवापर केला जातोय. राजकीय मतभेद असले तरी लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्र राहायलाच हवं.”
Sikander Sheikh : सिकंदर शेख ‘महाराष्ट्र केसरी’ ते शस्त्रांची तस्करी!
याचदरम्यान पवारांनी शासनावर थेट बोट ठेवत म्हटलं —
“काही ठिकाणी लोकांनी तक्रारी केल्या, बनावट आधार कार्ड सापडले, पुरावे दाखवले, कलेक्टरला कळवलं. पण आरोप सिद्ध करणाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. खोटेपणा उघड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सर्वांना संरक्षण देतं. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
Bachchu Kadu : शरद जोशींनंतर पहिल्यांदाच एकवटला शेतकऱ्यांचा महासागर !
पवारांनी पुढे आवाहन केलं, “आपले पक्ष वेगळे आहेत, विचारधारा वेगळी आहे. पण लोकशाही टिकवायची असेल, मतांचा अधिकार जपायचा असेल, तर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आजच्या व्यासपीठावरून आम्ही ठरवलं आहे मतचोरी थांबवू आणि लोकशाही सुरक्षित ठेवू
मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांनी मतदार याद्यांवरील कथित गोंधळ, मतांचा गैरवापर आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात एकत्र येत सरकारवर हल्लाबोल केला. या मोर्चामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
_____








