Satyatacha morcha : राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली !

BJP leaders warning, action will be taken as per rules : भाजप नेत्याचा इशारा, तर नियमाप्रमाणे कारवाई होईल

Mumbai : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्याच्या “सत्याच्या मोर्चा”ला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. मतचोरी, मतदार यादीतील गोंधळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला विरोधक एकत्र आले असले तरी आता पोलिसांच्या निर्णयामुळे त्यांची अडचण वाढली आहे.

या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा उद्या 1 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार होता. दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा पार पडणार होता, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होऊ नये, अशी आयोजकांची भूमिका होती.

Olympic Association : अध्यक्षपदासाठी अजित पवार; तीन उमेदवार बिनविरोध

मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिका परिसर आणि आझाद मैदानाच्या बाहेर कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढण्यास नियमांनुसार परवानगी देता येणार नाही. आझाद मैदानाच्या आतच सभा घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र त्याच्या बाहेरील मोर्चाला परवानगी मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा आता परवानगीविनाच काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray : ‘सत्याच्या मोर्चा’पूर्वी उद्धव ठाकरे अडचणीत?

या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “महाविकास आघाडी आणि मनसेने जर परवानगी न घेता मोर्चा काढला, तर नियमांनुसार निश्चित कारवाई केली जाईल,” त्यामुळे उद्याच्या मोर्चाबाबत विरोधक नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या सहभागाबाबतही काहीसे अस्पष्ट चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे दोन वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. इतर नेत्यांच्या उपस्थितीबाबत अजून निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

Encounter case : जर पैसे खरोखर येत असतील तर कुटुंबाला मदत करीन

बिहार निवडणुकांमुळे काँग्रेस नेते सध्या व्यस्त असून, महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चापासून त्यांनी थोडे अंतर ठेवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय आणि दुसरीकडे भाजपकडून दिलेला इशारा या दोन घटनांमुळे उद्याचा “सत्याचा मोर्चा” राजकीयदृष्ट्या अधिक नाट्यमय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

________