BJP shocked by the role of allies in power : सत्तेतील मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे भाजपला चिमटा!
Mumbai : मुंबईत मनसे, महाविकास आघाडी आणि डावे पक्ष यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ‘सत्याचा मोर्चा निघाला आहे. राज्यभर या मोर्चाची चर्चा रंगली असून, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दादर येथून लोकलने चर्चगेटला पोहोचले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील मोर्चाच्या स्थळी रवाना झाले असून, इतर विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या ‘सत्याच्या मोर्चा’विषयी मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपसोबत सत्तेत असलेले काही नेते या मुद्द्यावर वेगळे मत मांडताना दिसले आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी मतदार याद्यांतील अनियमितते बाबत भाष्य करताना म्हटलं, “निवडणुकीच्या काळात अनेक बाबी समोर येतात. त्यामध्ये बोगस मतदार यादी हा एक गंभीर मुद्दा आहे. काही लोक आणि पक्ष म्हणतात की एका यादीत अधिक नावं आहेत. आज जो मोर्चा काढला आहे त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. या मोर्चाला आमचा विरोध नाही.”
शिरसाट म्हणाले, “बोगस मतदार याद्या केवळ एका मतदारसंघापुरत्या मर्यादित नाहीत, त्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. हे थांबवणं आवश्यक आहे. काही वेळा जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर मतदान होतं, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. हा प्रकार कोण करतं यावर मी बोलणार नाही, पण हे होऊ नये याबाबत आम्हीही एकमत आहोत.”
Contradictory movement : ‘सत्याचा मोर्चा’ विरुद्ध ‘मुक आंदोलन’
तथापि, त्यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका करताना तो ‘राजकीय स्टंट’ असल्याचं म्हटलं. “ही स्टंटबाजी आहे. याआधीच हे नेते निवडणूक आयोगाला भेटले होते, मग लोकांना रस्त्यावर आणण्याची गरज काय? हा मोर्चा फक्त शक्तिप्रदर्शन आणि राजकीय प्रचारासाठी आहे. महाविकास आघाडी किती संघटित आहे हे दाखवण्याचं हे एक नाटक आहे. ज्या प्रश्नासाठी मोर्चा काढलात तो प्रश्न बैठकीत सोडवता आला असता. मुंबईकरांना वेठीस धरणं योग्य नाही,” असं शिरसाट म्हणाले.
Loan waiver : बिनव्याजी कर्ज मिळतंय, मग ते वेळेवर फेडायची सवय लावा !
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या वक्तव्यानेही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी म्हटलं, “आजचा मोर्चा हा इंडिया आघाडीचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या आघाडीचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जातोय, पण मतदारांची यादी तयार होताना या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्या होत्या. ती संधी विरोधकांनी गमावली.”
Anil Deshmukh : मतचोरी आणि कर्जमाफी, अनिल देशमुखांचा सरकारवर प्रहार !
मुश्रीफ पुढे म्हणाले, “आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे. काही चुका या यंत्रणांमध्ये होतातच, पण त्या सुधारता येतात. जर आजचा मोर्चा मतदार याद्यांतील चुका दूर करण्यासाठी असेल, तर आम्हालाही त्यास हरकत नाही. सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेणं चुकीचं आहे, आणि त्या दुरुस्त करण्यास आम्हीही तयार आहोत.”
राज्याच्या राजकीय रंगमंचावर आज महाविकास आघाडी आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ एकीकडे तर भाजपच्या ‘मुक आंदोलनाची’ तयारी दुसरीकडे अशा स्थितीत मुंबईत राजकीय तापमान उच्चांकावर पोहोचले आहे. मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, या मोर्च्याचे राजकीय पडसाद पुढील काही दिवस राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.
______








