Saudi Arabia Accident : सौदी अरेबियात भीषण बस अपघात !

saudi arabia accident 42 indians feared dead : 42 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

Saudi : सौदी अरेबियातील मदिना परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने भारतीय समुदाय हादरला आहे. बद्र मदिना महामार्गावर रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस आणि डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर क्षणार्धात प्रचंड स्फोट झाला आणि बसने भीषण पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या बसमध्ये तीर्थयात्रेसाठी मदिना येथे आलेले भारतीय नागरिक होते आणि त्यापैकी 42 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघातातील सर्व प्रवासी हैदराबाद आणि तेलंगणातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या बातमीमुळे तेलंगणा राज्यात शोककळा पसरली आहे. मक्का येथील उमराह दर्शन करून सर्व भाविक मदिनाकडे परतत होते, तेव्हा हा अपघात घडला. मृतांमध्ये 20 महिलांचा आणि 11 लहान मुलांचा समावेश असू शकतो, अशी माहिती काही स्थानिक देत आहेत. मात्र सौदी अरेबियातील प्रशासनाने अजून अधिकृत मृतांची संख्या जाहीर केलेली नाही.

Local Body Elections : रस्सीखेच, बंडखोरी अन् सस्पेन्स पॉलिटिक्स!

मदिना यात्रेचे आयोजन करणाऱ्या टूर ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 भारतीयांचा मृत्यू निश्चित झाला असून, बस पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. डिझेल टँकरच्या धडकेने बसचा पुढील भाग क्षणार्धात ज्वाळांनी वेढल्याने बचावाची कोणतीही शक्यता राहिली नाही. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Anil Deshmukh : सत्तेसाठी नैतिकता गहाण ठेवणाऱ्यांना पवार साहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही !

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य प्रशासनाला तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी समन्वय वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कुटुंबीयांना योग्य माहिती मिळावी म्हणून विशेष कंट्रोल रूम उभारण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

Local Body Elections : चिखली निवडणुकीत ‘संपूर्ण सस्पेन्स’, बंडखोरी अटळ, राजकीय वातावरण तापलं

या भीषण दुर्घटनेनंतर सौदी आणि भारतीय सरकारकडून अधिकृत आकडेवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. घटनास्थळी तपास सुरू असून जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. हा संपूर्ण प्रकार मदिना मार्गावरील सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करतो आणि भारतीय समुदायात प्रचंड दुःख आणि चिंता निर्माण करणारा ठरला आहे.

______