Satara police will come to Wardha for investigation : खवले मांजर तस्करीचे जाळे राज्यभर; चौकशीतून होणार खुलासे
Wardha खवले माजंरीच्या तस्करीचे प्रकरण आता फक्त वर्धा जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणातील चार आरोपी सापडल्यामुळे राज्यभरातील Network उघडकीस येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे रॅकेट पसरले असल्याची शंका आहे. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आता सातारा जिल्ह्यातील पोलीसही वर्धा येथे येणार असल्याची माहिती आहे.
वन्यजीव तस्करीत मोठी साखळी सहभागी असल्याचे दिसून येत आहे. अशांचा शोध विविध जिल्ह्यांतील पोलिसांकडून सुरू आहे. पुलगावच्या घटनेनंतर ‘बुवाबाजी’चा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्या पार्श्वभूमीवर फलटण (सातारा) येथील पोलिसांचे पथक आरोपींची चौकशी करण्यासाठी वर्ध्यात दाखल होणार आहेत, असे कळते.
Har Ghar Nal Se Jal : नागपूर विभागात 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणी!
पुलगाव येथे वनविभागाने सहा तस्करांना बेड्या ठोकत कोट्यवधी रुपयांत खवले मांजराची होणारी खरेदी-विक्री उधळून लावली. सध्या आरोपी वनकोठडीत असून त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. फलटण आणि सातारा पोलिसांकडूनही आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांबाबत ‘इंटोरागेट’ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आणखी कोणकोणत्या जिल्ह्यात तस्करांचे कनेक्शन आहे, हे देखील तपासले जाणार आहे.
गुप्तधन शोधण्यासाठी सहभागी असलेल्या मांत्रिकाला आरोपी हे अमरावती येथील बसस्थानक परिसरात भेटत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वनकोठडीत असलेल्या आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या पायाळू महिलांचा वापर गुप्तधन शोधण्यासाठी केला जात होता. मोबाईलमधील महिलांचे छायाचित्र आणि व्हिडीओचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. सर्व माहिती गोळा करून यासंदर्भात पोलिस विभागाला पत्राद्वारे माहिती दिली जाणार आहे.
खवले मांजर तस्करी प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याचे पुढे आले. त्या अनुषंगाने पारधी बेड्यावरील रहिवासी महिलेचा शोध युद्धस्तरावर सुरू असून तिला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तस्करीतील सहा आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवार, ४ मार्च रोजी पुन्हा न्यायालयात आरोपींना हजर केले जाणार असून त्यांच्या कोठडीत वाढ होणार की, न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
Babasaheb Patil : चार महिने लोटले, ना समित्या नेमल्या, ना पदं दिली!
हिंगणी येथे मांडूळ, आष्टी आणि पुलगावात खवले मांजर तस्करीतील आरोपी एकमेकांशी ‘कनेक्ट’ असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे लगतच्या इतर जिल्ह्यांतही यांची मोठी साखळी आहे. आरोपी पक्षराज पवार याने आष्टी येथे खवले मांजरचा सौदा केला होता. तेथून आरोपी हे मांजरीला घेऊन अकोला येथे गेले होते. मात्र, अकोला वनविभागाने आरोपींना पकडून गुन्हा दाखल केला होता. तेथील वनविभागाची चमू पुढील तपासाकरिता आष्टीत दाखल झाले होते.