The scholarship should be received in the current academic year only : सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे स्कॉलरशिप परिषद
Akola सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त वतीने स्कॉलरशिप परिषदेत अत्यंत महत्त्वाचे ठराव करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातच शिष्यवृत्ती मिळावी, असा ठराव मांडण्यात आला. यासोबतच स्वाधार योजनेचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यात नियमित जमा व्हावे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्था स्थापन करावी, या मागण्यांचेही ठराव मांडण्यात आले.
दि. १ फेब्रुवारीला अशोक वाटिका येथे ही परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. परिषदेला पी.जे. वानखेडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. तर महेश भारतीय (राष्ट्रीय खजिनदार, वंचित बहुजन आघाडी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
DCM Ajit Pawar Akash Fundkar : पायाभूत आणि आरोग्य सुविधांवर भर
इंजिनीयर धीरज इंगळे (जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन), अक्षय डोंगरे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), श्रीकांत घोगरे (युवक आघाडी अध्यक्ष), राजकुमार दामोदर (महासचिव), नंदकुमार डोंगरे (जिल्हा महासचिव, भारतीय बौद्ध महासभा), रमेश सरकटे, मजर खान, वैभव खडसे, नितीन सपकाळ, मोहित दामोदर, अभिषेक सपकाळ, प्राची दामोदर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आणि शिष्यवृत्ती माफ करावी. मागासवर्गीय, आदिवासी आणि महिला वस्तीगृहांसाठी आर्थिक तरतूद 2025-26 च्या बजेटमध्ये समाविष्ट करावी. महागाई दरानुसार शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी, असेही ठराव मांडण्यात आले. बार्टी मार्फत IBPS परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी आणि महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती जनजागृती अभियान राबवावेहे प्रस्ताव देखील मांडण्यात आले.
CM Devendra Fadnavis : प्रधानमंत्री आवास घरकुलांच्या कामांना गती द्या
हे सर्व ठराव मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, समाज कल्याण विभाग आणि समाज कल्याण मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. या परिषदेला आदित्य बावनगडे, अंकित इंगळे, प्रथमेश गोपनारायण, अंकुश धुरंदर, निखिल उपर्वट, शैलेश शिरसाट, आयुष समदूरे, रियांश मारवाल, अजय दाभाडे, हर्षदीप गवई यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे यांनी केले, संचालन राज्य प्रवक्ते विशाल नंदागवळी यांनी केले, तर आभार आदित्य बावनगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा आणि विद्वत सभा यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.