Former MLA Nago Ganar supports innocent teachers : निर्दोष शिक्षक आणि कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजला. या घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांनाही गजाआड करण्यात आले. एसआयटीने ही कारवाई केली. या घोटाळ्याची पाळेमुळे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात पसरली आहेत. त्यामुळे आणखी सखोल चौकशीची गरज आहे आणि शासनाकडून ती केली जात आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. यावर कुणाचेही दुमत नाही. पण या सर्व गोंधळात निर्दोश शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
राज्यात हा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च २०२५ पासून थांबवण्यात आले आहेत. बोगस शालार्थ आयडी प्रकरणामुळे अनेक शिक्षक वेतनापासून अजूनही वंचित आहेत. या नाराज शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आता आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
Gold Rate : इराण-इस्त्रायल युद्ध भडकले, सोन्याने गाठला लाखाचा टप्पा
वेतनापासून वंचित असलेले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नागपुरात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी आपापल्या अडचणी सांगितल्या. आता सर्वांनी एकत्र येत पुढील लढ्याची दिशा ठरवली आहे. यानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी माजी आमदार नागो गाणार यांची भेट घेतली. दोषी शिक्षकांवर कारवाई करा पण इतर शिक्षकांचा पगार कशाला रोखता, असा सवाल करत नागो गाणार यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Accident at a tourist spot : मनालीमध्ये झिप लाइन अपघातात नागपूरची त्रिशा गंभीर जखमी
शिक्षकांनी नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांचीही भेट घेतली. तपास सुरू ठेवा, पण दोषी नसलेल्या शिक्षकांचे वेतन रोखू नका, अशी विनंती शिक्षकांनी पोलिस आयुक्तांना केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगारच नसल्याने शिक्षक व कर्मचारी अडचणीत आले आहेत. या महिन्यात वेतन सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.