Incriminating documents found in Chintaman Vanjari’s house : नागपूर आणि यवतमाळातील घरांची पोलिसांनी घेतली झडती
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजत आहे. अजूनही या घोटाळ्यातील आरोपींचे अटसत्र सुरूच आहे. दरम्यान यापूर्वीच अटक करण्यात आलेले प्रभारी उपसंचालक आणि नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या नागपूर आणि यवतमाळ येथील घरांची पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये अनेक आक्षेपार्ह दस्तावेज सापडल्याची माहिती आहे.
पोलिसांनी चिंतामण वंजारी यांना मागील आठवड्यात गुरूवारी रात्री त्यांच्या घरातून अटक केली होती. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. २९ मे पर्यंत ते कोठडीतच राहणार आहेत. काल रविवारी (२५ मे) त्यांच्या नागपूर आणि यवतमाळ येथील घरांची झडती घेण्यात आली. दोन्ही घरांच्या तपासणीत महत्वाची कागदपत्रे सापडल्याचे सूत्र सांगतात. पोलीस कागदपत्रांची कसून तपासणी करत आहेत.
Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या मशाली पेटल्या तर काय-काय जाळतील ?
या प्रकरणात सर्वप्रथम प्रभारी विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटकसत्र सुरू झाले, ते अजूनही सुरूच आहे. उपसंचालक कार्यालयातील सूरज नाईक, दुधाळकर भारत ढवळे आणि आणखी काही लोकांना अटक करण्यात आली. चौकशी सुरू असतानाच नरड यांना निलंबित करण्यात आले. लक्ष्मण मंगाम याला अटक केल्यानंतर चिंतामण वंजारी, वैशाली जामदार आणि इतर काही नावे समोर आली होती.
NCP Rohini Khadse : महिला आयोग नव्हे, रुपाली चाकणकरांचा धमकी आयोग !
घोटाळा झाला तेव्हा वंजारी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची विभागीय शिक्षण मंडळात सचिव म्हणून पदोन्नती झाली होती. २८१ बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते. येवढेच नव्हे तर त्यांचे पगारही सुरू करण्यात आले होते. यामध्ये चिंतामण वंजारी यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली.