School ID scam : शालार्थ आयटी घोटाळ्यातील फरार निलेश वाघमारेला अटक !

Nilesh Waghmare, absconding in Shalarth IT scam, arrested : उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच फेटाळला होता अटकपूर्व जामीन

Nagpur : बनावट शालार्थ आयडी घोटाळा जरी नागपुरात उघडकीस आला असला तरी या घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत. या घोटाळ्यात आतापर्यंत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार आणि वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे हा फरार होता. त्याला नागपूर सायबर पोलिसांनी त्याच्या धरमपेठेतील घरातून काल (१४ ऑगस्ट) अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या गैरव्यवहारातून वाघमारेने कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे. सन २०१९पासून नागपूर जिल्ह्यात शाळा व शिक्षण संस्थांना नियमबाह्य पद्धतीने शालार्थ आयडी देण्यात आले. यामुळे वेतन घेण्यासाठी पात्र नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतून पगार देण्यात आले आहेत. २०१९ ते २०२५ या काळात शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचे तपासात उघड झाले आहे. या गैरप्रकारानंतर वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. पण अद्याप ते पोलिसांना चकमा देत होते.

Maratha movement : आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर…

नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रविंद्र पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. ही तक्रार सद्यस्थितीत अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सुचनेवरून दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीवरून तपास सुरू झाला. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली. त्यांच्या अहवालात जिल्ह्यात ५८० पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी शहानिशा न करता किंवा जाणीवपूर्वक बनवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Sudhir Mungantiwar : ‘ आ. सुधीर मुनगंटीवार यांची ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानासाठी निवड’

 

 

शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर वाघमारे यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी वाघमारे धरमपेठेतील त्यांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.