It will soon be revealed what transaction the seized documents are about : जप्तीतील कागदपत्रे नेमकी कुठल्या व्यवहाराची आहे, हे लवकरच समोर येणार आहे
Yavatmal News : दिग्रस येथील ४४ कोटींच्या अपहाराचा मास्टरमाइंड प्रणीत मोरे याच्या दिग्रस येथील घराची पोलिसांनी सोमवारी (२० जानेवारी) झडती घेतली. एसडीपीओसह एलसीबीचे पथक दुपारपासूनच येथे तळ ठोकून होते. घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
जनसंघर्ष अर्बन निधीत प्रणीत मोरेसह संचालक मंडळाने अपहार करून ६ हजार २०० खातेदारांची फसवणूक केली. या सर्व संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या प्रणीत मोरेला पोलिसांनी दिग्रस येथील घरी सोमवारी दुपारी आणले. यावेळी पोलिस पथकाने प्रणीतच्या घराची तपासणी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. पोलिस पथकाच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत.
Maharashtrta Government : गतिमान, पारदर्शक कारभाराकरिता सरसावले प्रशासन !
प्रणीतला पोलिसांनी घरी आणल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयही लक्ष ठेवून आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. पोलिस तपास पूर्ण होऊन कष्टाचे पैसे कधी परत मिळतात, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. आरोपींची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करावा व पैसे परत द्यावे, अशी मागणी सहा हजार २०० खातेदारांची आहे.
Backpacks on students’ backs : विद्यार्थ्यांच्या पाठीवर दहा किलोचे दप्तर !
पोलिसांनी यापूर्वी साहिल जयस्वाल याच्या घराची झडती घेतली होती. त्यानंतर प्रणीतच्या घराची झडती घेण्यात आली. आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी पुरावे गोळा करण्यावर अधिक भर दिला आहे. यातूनच पोलिसांनी या गुन्ह्याचा चौफेर तपास चालविला आहे. तपासात प्रत्येक बारकावे शोधून काढले जात आहेत. अपहार प्रकरणात पोलिसांनी दिग्रस येथे प्रणित मोरे याच्या घराची झडती घेत कागदपत्रे जप्त केली. जप्तीतील कागदपत्रे नेमकी कुठल्या व्यवहाराची आहे, हे लवकरच समोर येणार आहे.