Collect information directly from the mobile app : मोबाईल ॲप मधून थेट माहिती गोळा
New Delhi : करोनामुळे २०२१ साली होऊ न शकलेली जनगणना आता प्रत्यक्षात राबवली जाणार आहे. यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे.
माहिती गोळा करणारे कर्मचारी स्वतःच्या मोबाईल फोनवर खास जनगणना ॲप वापरणार आहेत. गोळा केलेला डेटा थेट केंद्रीय सर्व्हरवर अपलोड केला जाईल. ॲप इंग्रजीसोबत प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि अँड्रॉइड-आयओएस दोन्हीवर वापरता येईल. जर कुठे कागदावर नोंदी झाल्या, तर त्या नंतर अधिकृत वेबसाईटवर अपलोड कराव्या लागतील.
Reservation controversy : हैदराबाद गॅझेटियरमुळे नवा पेच; मुंबईत महत्त्वाची बैठक
जनगणनेचं काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान घरांबाबतची माहिती गोळा केली जाईल. त्यात घराची अवस्था, सोयी-सुविधा आणि घराशी निगडीत मालमत्ता यांचा समावेश असेल. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल आणि त्यात प्रत्यक्ष व्यक्तींची माहिती घेतली जाईल. मात्र लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये सप्टेंबर २०२६ मध्येच संपूर्ण जनगणना केली जाणार आहे.
Bharat Vishwaguru : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी गुरुत्व दाखवावे लागेल !
या वेळच्या जनगणनेत पहिल्यांदाच जातीसंदर्भातील माहितीही गोळा करण्यात येणार आहे. देशभरातील जवळपास ३४ लाख कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. डिजिटल पद्धतीमुळे आधीप्रमाणे माहिती पुन्हा स्कॅन करणे किंवा ऑनलाईन भरण्याची गरज भासणार नाही.
_____