Breaking

Session court of Gondia : अल्पवयीन मुलीला चार वर्षांनी न्याय!

Rigorous imprisonment for molesting a minor girl : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास; विशेष सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

Gondia घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास विशेष सत्र न्यायालयाने एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सालेकसा तालुक्यात ४ मार्च २०२१ रोजीचे हे प्रकरण असून न्यायालयाने मंगळवारी (दि.११) त्यावर सुनावणी केली. शत्रुघ्न छन्नुलाल गौतम (३८, ता. सालेकसा) असे आरोपीचे नाव आहे.

४ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान फिर्यादी-पिडीत मुलीचे (१७) आई-वडील रोजगार हमी योजनेच्या कामावर गेल्याने ती घरी एकटीच होती. ही संधी साधून आरोपी शत्रुघ्न गौतम घरात शिरला व पिडीतेचा हात पकडून तिला लैंगिक सुखाची मागणी करून विनयभंग केला होता. या घटनेची माहिती फिर्यादीने ५ मार्च रोजी आई-वडिलांना दिली.

Crime in Buldhana : पोलिसांनी काढली ‘रावण’ची धिंड!

त्यावरून फिर्यादी व तिच्या आईवडिलांनी आरोपीविरूध्द सालेकसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन तपासी पोलीस अधिकारी भिष्मराज सोरते, पोलीस उपनिरिक्षक, पो.स्टे. सालेकसा यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात कलम ३५४, ३५४(अ), ४५२ भादंवि तसेच कलम १२ पोक्सो कायद्यान्वये दोषारोपपत्र सादर केले होते.

या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार तथा पिडित पक्षातर्फे सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी एकुण सहा साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर सादर केली. आरोपीचे वकील व पिडीत फिर्यादीतर्फे सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश यांनी आरोपीविरुद्ध सरकार पक्षाचा युक्तीवाद व इतर कागदोपत्री पुरावे ग्राहय धरून आरोपी शत्रुघ्न गौतम यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात महिला पोलिस पैरवी कर्मचारी मरीयम खान यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले.

Accident in Buldhana : प्रवाशांनी भरलेली एसटी दुभाजकावर आदळली!

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाचे कलम ३५४ अंतर्गत एक वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच भारतीय दंड विधानाचे कलम ३५४-अ (२) अंतर्गत एक वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.