Height of perversity : अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यातील पेठ येथील घटना
Buldhana एका अल्पवयीन बालकावर वसतिगृहाच्या अधिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला. विकृतीचा कळस गाठणाऱ्या या अधिक्षकाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही घृणास्पद घटना चिखली तालुक्यातील पेठ येथील श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय वसतीगृहात घडली. घटना घडल्यानंतर चार दिवसांनी ती उघडकीस आली आहे.
अनैसर्गिक अत्याचाराची घटना दि. ३ जानेवारी रोजी रात्री ९ ते ९.३०च्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित बालकाच्या आईने अमडापूर पाेलिसात तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी आराेपी वसतिगृह अधीक्षक विनायक भगवान देशमुख (भाऊ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे.
चिखली तालुक्यातील पेठ येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील मुलेही शिक्षण घेण्यासाठी राहतात. याच वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षे वयाच्या बालकावर वसतिगृह अधीक्षक विनायक भगवान देशमुख (भाऊ), रा. पेठ याने अत्याचार केले. ही घटना पीडित मुलाने आपल्या आईला सांगितली. मुलाच्या आईने या प्रकरणी अमडापूर पाेलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पेालिसांनी आराेपीस अटक केली आहे.
NIT, Nagpur Municipal Commissioner : थंडीच्या दिवसांत पहाटे पाचला उद्यानात कोण येणार ?
जिल्ह्यात संतापाची लाट
महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. वसतिगृहातील मुलेही सुरक्षीत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या आराेपी नराधमाला कठाेर शिक्षा करण्याची मागणी हाेत आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.