Rohini Khadse led women protesters in front of Chief Minister : मुख्यमंत्र्यांच्या समोर महिला आंदोलकांचे नेतृत्व, पोलिसांनी घेतले ताब्यात
Mumbai राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा लागू करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असलेल्या सह्याद्री अतिथीगृहासमोर आंदोलन केले. त्यांनी जागतिक महिला दिनी दुर्गावतार दाखवला. रोहिणी खडसे यांच्यासह आंदोलक महिलांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचारामध्ये सातत्याने वाढ आहे. बदलापूर, पुणे, ठाणे सारख्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ आहेत. एवढेच नव्हे तर रोहिणी खडसे यांच्या वहिणी व केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यात राज्य सरकारला यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन केले.
Congress MP Balwant Wankhede : महायुतीच्या घोटाळ्यांची पोलखोल करा!
महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा महाविकास आघाडीचे सरकार असताना एकमताने संमत करण्यात आला होता. परंतु या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संमती दिली नाही. यामुळे या कायद्याची अंमलबजावणी राज्यात होऊ शकली नाही. या शक्ती कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आंदोलन केले होते.
Vijay Wadettiwar : बीडचं राजकारण म्हणजे मराठा विरूद्ध ओबीसी!
सह्याद्री या अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू होती. याचवेळी काही महिला तेथे एकत्रित आल्या. यानंतर काही वेळानंतर रोहिणी खडसे तेथे आल्या व शक्ती कायदा संमत करण्यात यावा, अशी मागणी मागण्या करू लागल्या. अचानकपणे महिला आंदोलक एकत्रित आल्याने पहिल्यांदा पोलिसांना चकमा खावा लागला. परंतु पोलिसांनी महिला आंदोलकांना सह्याद्री अतिथीगृहात जाण्यापासून रोखले. तेव्हा रोहिणी खडसे व पोलिसांशी बाचाबाची झाली. अखेर रोहिणी खडसे यांच्यासह महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मलबार पोलिस ठाण्यात नेले.