Shakuntala Railway : ३६ आंदोलनांनंतर ‘शकुंतला’चे ग्रहण सुटले!

Central Railway approved DPR for Broad Gauge : ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेची मंजुरी; सत्याग्रह समितीच्या लढ्याला यश

Amravati सात वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्याची माहिती शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीला देण्यात आली. आतापर्यंत समितीच्या वतीने ३६ अहिंसक आंदोलन करण्यात आली होती.

अचलपूर-मूर्तिजापूर नॅरोगेज मार्गावरील नागरिकांच्या समन्वयातून स्थापन झालेल्या सत्याग्रह समितीने २०२२ मध्ये अंतिम स्थान सर्वेक्षण (एफएलएस) मंजूर करून घेतले होते. मात्र डीपीआर न झाल्याने प्रकल्प रखडला होता. बुधवारी समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे, डॉ. राजा धर्माधिकारी, विजय गोंडचवर, दयाराम चंदेले यांनी भुसावळ येथील मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता (निर्माण) संदीप सिन्हा यांच्याशी चर्चा केली. या वेळी अचलपूर–मूर्तिजापूर विभागाचा डीपीआर मार्गी लागल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Adani group : नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, कोळसा खाणीच्या विरोधात वातावरण तापले

गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, शारदा उईके, कमल केजरीवाल, राजकुमार बरडिया आदींसह शेकडो सत्याग्रहींनी सातत्याने लढा दिला. समितीच्या आंदोलनांना माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण संघटन, संस्कार भारती, मानव सेवा समिती, व्यापारी संघटना यासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला.

EWS reservation ends : मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण संपुष्टात !

मूर्तिजापूर–अचलपूर ७६.५६ किमी नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे पत्र खासदार बळवंत वानखडे यांना प्राप्त झाले आहे. त्यांनी २२ मे २०२५ रोजी रेल्वे बोर्डाकडे डीपीआर मंजुरीची मागणी केली होती. मंजुरी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.