Breaking

Shambhuraj Desai : लोणार सरोवर येथील सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

The issue of facilities at Lonar Sarovar is again raised : मुंबईत बैठक; विकासकामांना वेग देण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Buldhana जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पण गेल्या अनेक वर्षांपासून येथील सोयीसुविधांचा प्रश्न गाजत आहेत. अनेकदा सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे, तर कधी विदेशातील पर्यटकांमुळे हा विषय चर्चेला आला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली. स्वतः पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी हा विषय छेडला. सोयीसुविधा निर्माण करा आणि विकासकामांना गती द्या, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोणार सरोवराचे जतन, संवर्धन, आणि विकास आराखड्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी. दूरदृष्यप्रणाली वरून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, पुरातत्व विभागाचे अरुण मलिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Crime in Gondia : वर्षभर घरातच चोरी; अल्पवयीन मुलाची भलतीच Daring!

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटक तर येतातच. शिवाय, संशोधन करणारे अभ्यासकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञ ही बरेचदा येथे येत असतात. त्यामुळे योग्य सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी यावेळी दिले. पर्यटन विभागाकडून दिला जाणारा विकास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Gondia Zilla Parishad : विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व !

पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. तसेच या ठिकाणी पर्यटकांची सोय व्हावी म्हणून रोप-वेची सुविधा करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच इतर काही अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सोडवण्याचे निर्देशही देसाई यांनी यावेळी दिले.