Breaking

Shanbhuraj Desai : ३०० वर्षांपूर्वी असलेला पाचाडचा वाडा होता तसाच निर्माण करण्याचा प्रयत्न !

 

An attempt to recreate the Pachadcha Wada as it was 300 years ago : पर्यटन विभागाच्या आराखड्यात प्रथम प्राधान्य, शंभूराज देसाईंची घोषणा

Mumbai : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थीम पार्क संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या थीम पार्क संग्रहालयाचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने घोषित करावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (५ मार्च) विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रती सरकार अनेक ठिकाणी स्मृती भवने, थीम पार्क उभारत आहे. त्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा. जिजाऊंच्या पाचाड येथील वाड्याच्या कामाचाही कालबद्ध कार्यक्रम जाहीर करुन ते काम पूर्ण करावे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी रायगड किल्ल्यासाठी प्राधिकरण तयार केले आहे, त्याचेही काम प्रगतीपथावर आहे.

Anil Deshmukh : गृहमंत्र्यांना या व्हिडिओची माहिती अगोदरच होती !

ही शिवसृष्टी झाली तर पर्यटक आणखी मोठ्या संख्येने येतील व आपल्या राजांचा इतिहास सर्वदूर जाईल. त्यामुळे यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा, अशी विनंती दरेकर यांनी सभागृहात केली. या प्रश्नाला सरकारतर्फे उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड संवर्धन प्राधिकरण हे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केले आहे. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर वेगळ्या पद्धतीचे संवर्धनाचे काम सुरू आहे.

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा!

प्रवीण दरेकरांनी उल्लेख केला ती जागा पाचाड येथे आहे. जिथे राजमाता जिजाऊंचा वाडा होता. जिजाऊंनी तेथेच देह ठेवला. तो पाचाडचा वाडा शिवकाळात जसा होता तसाच करण्याचे नियोजन आहे. ती जागा पुरातन खात्याच्या अखत्यारीत येत नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याला प्रथम प्राधान्य या वर्षाच्या पर्यटन विभागाच्या आराखड्यात दिले जाईल.