Hindu organizations strongly object to 114 Muslim employees :114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल हिंदू संघटनांचा तीव्र आक्षेप
Shani Shingnapur : हिंदू संघटनांनी शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टवर, नोकरीला असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र आक्षेप घेतला. या संदर्भात त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ट्रस्टने 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे!
श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दररोज दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक इथे येत असतात.
या शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अन्यथा 14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठी रॅली काढली जाईल असा इशारा संघटनेने दिला होता. उद्या शनिवारी 14 जून आहे. मात्र त्याआधीच मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला.
Anil Deshmukh : ‘स्थानिक’च्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील
श्री क्षेत्र शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने तिथे काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्त पालन न केल्याच्या कारणावरून या सगळ्या कर्मचाऱ्यांना
काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण संस्थेने दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांचे मंदिर आणि ट्रस्ट मध्ये काय काम असा सवाल उपस्थित करत आक्षेप घेण्यात येत होते
Vijay Wadettiwar : दोन भावांचं जाऊ द्या; योजना बंद पडताहेत, त्याचं बघा !
शनि देवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन ही करण्यात आले होते. या बाबत ट्रस्टच म्हणणं होतं की, ‘मंदिर ट्रस्टमध्ये एकूण 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात. परंतु मंदिर परिसरात एकही मुस्लिम कर्मचारी ड्युटीवर नसतो, हे मुस्लिम कर्मचारी मंदिर ट्रस्टच्या कृषी विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षण विभागात काम करतात’.
Bachchu Kadu Visit : भाजपचे पक्षांतर जोरात, मात्र ‘भावांतर’ केव्हा ?
114 मुस्लिम कर्मचाऱ्यांपैकी 99 कर्मचारी मागच्या पाच महिन्यांपासून कामावर येत नाहीत. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले आहेत, असेही ट्रस्टकडून सांगण्यात येत होतं. मात्र हिंदू संघटनांनी त्यांच्या नियुक्तीवरच तीव्र आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वी ट्रस्ट ने एक निर्णय घेत, अनियमित तेचे कारण देत सगळ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
————