Bullock teams from Madhya Pradesh participated : मध्य प्रदेशातील बैलजोड्यांनी घेतला सहभाग
Wardha रोहणा येथे आयोजित शंकरपटात विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेशातूनही शेतकऱ्यांनी बैलगाडा घेऊन पोहोचत धुरळा उडविला. या शंकरपटाच्या स्पर्धेत अ गटामध्ये प्रथम क्रमांक बैतूल (मध्य प्रदेश) येथील रामप्रसाद राठोड यांच्या मिसाईल-देवाने पटकावला. द्वितीय ढंनी ग्रुप जिगरी ग्रुप अमरावती येथील शंभू महाराज तर तृतीय अंकुश जवंजाळ परतवाडा यांच्या काशी-बाजी या बैलजोडीने पटकाविला.
नवचैतन्य कला व क्रीडा मंडळ रोहणा व काँग्रेस कमिटीद्वारा माजी आमदार दिवंगत धैर्यशील वाघ व दिवंगत भाऊसाहेब कुऱ्हाडे यांच्या स्मृतीत शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटात बैतूलच्या मिसाईल आणि देवा जोडीने बाजी मारली. शंकरपटाचे उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार अमर काळे होते. माजी मंत्री रणजित कांबळे, अ. भा. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांची उपस्थिती होती.
स्थानिक शेतकरी सतीश जुवारे, डॉ. अनिता बोबडे, कोकिळा जुखारे, सरिता जुवारे, सुनील चाफले हे मलेशिया येथे नोकरीला आहे. तर ऑस्ट्रेलिया येथे विनय देशपांडे, पंकज हेडाऊ हे आहे. शंकरपटाचा थरार अनुभवण्यासाठी शंकरपटात शेत मालक मायदेशी आले, हे विशेष.
Mahayuti Government : लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना सुरू
स्पर्धेत क गटामध्ये प्रथम प्रमोद दिवटे एकलासपूर यांच्या ओम-फायर, द्वितीय प्रमोद सोळंके यांच्या रुद्र-केसरी, तृतीय हेमंत फरकाडे मांडवा यांच्या मन्या-फायर या बैलजोडीने पटकावला. तालुका गटामध्ये डॉ. सालंकार यांच्या राघव किशनने प्रथम, द्वितीय धीरज कदम देऊरवाडा यांच्या हरण्या-शिवमने, तृतीय जयंत पांडे बहगाव यांच्या दक्ष-रावण या बैलजोडीने पटकाविला, शंकरपटात महिला घुरकरी अंकिता कावळे यांनी लक्ष वेधले.