Breaking

Sharad Pawar : सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये : शरद पवार

Ajit Pawar wins landslide victory in Malegaon factory elections : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांना घवघवीत यश

Baramati : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. माळेगाव कारखान्याच्या निकालात निमित्त ते पत्रकारांशी औपचारिक बोलत होते. या निवडणुकीत अजित पवारांना घवघवीत यश मिळताना दिसत आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली.
आपण आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत, सरकारी पदावर असताना सहकारी संस्थांची निवडणूक लढवली नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

NCP Sharad Pawar: सक्ती नको पण, 60 टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे दुर्लक्ष नको

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत.

___