Breaking

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू!

 

Anil Deshmukh is taking review from district-wise meetings : अनिल देशमुखांचे बैठकांचे सत्र; निवडणुकीसाठी लागले कामाला

Buldhana राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अनिल देशमुख व डॉ. राजेंद्र शिंगणे या दोन माजी मंत्र्यांवर विदर्भाची धुरा सोपवली आहे. दोघेही विदर्भ प्रभारी म्हणून कामालाही लागले आहेत. वऱ्हाडात ठाण मांडून देशमुखांनी बैठकाही घेतल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये Local Body Elections या बैठकांचा किती फायदा होतो, हे बघण्याची उत्सुकता लागलेली असेल.

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप झाले. दिड वर्ष त्यांनी तुरुंगात काढलं. बाहेर आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान काटोलमधून विधानसभा लढण्यासाठी त्यांनी मुलगा सलील याला पुढे केले. पण तेथे पराभव झाला आणि पारंपरिक मतदारसंघही हातून निसटला. अशात शरद पवारांनी देशमुखांकडे मोठी जबाबदारी देऊन विश्वास कायम ठेवला आहे.

दुसरीकडे, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एकदा शरद पवारांची साथ सोडली. जिल्हा सहकारी बँकांच्या मदतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याचं सांगितलं. अजितदादांनी शब्द दिला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत निष्ठा कायम आहे. पण शरद पवार हेच माझे आदर्श आहेत, असं ते वारंवार सांगत राहिले. ऐन निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी अजितदादांची साथ सोडली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांच्यावरही मोठी जबबादारी दिली आहे.

Anil Deshmukh : सरकारनेच निवडणुका लांबणीवर टाकल्या!

एकीकडे विदर्भात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अस्तित्व धोक्यात आले असताना दोन माजी मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यातून पक्षाला उभारी मिळेल असा विश्वास शरद पवारांना वाटत आहे. पण, विदर्भातील सध्याची परिस्थिती बघता दोन्ही नेत्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

पश्चिम विदर्भातील जिल्हास्तरीय दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले.ॉ बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर यांच्या अध्यक्षतेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रसन्न पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. संतोष देशमुख, स्व. मा. मा. देशमुख, युवा शेतकरी स्व. कैलास नागरे आणि स्व. भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय मूळ वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

Anil Deshmukh : मुख्यमंत्री महोदय, कर्जमाफीचा शब्द पाळा!

विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या यशानंतर महायुतीच्या फसव्या आश्वासनांवर टीका केली. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि संघर्षाच्या काळात पक्षासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्याचे आवाहन केले.
रेखा खेडेकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील आणि भास्करराव नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले.