Eknath Shinde said, we never go sideways when we are walking straight. : एकनाथ शिंदे म्हणाले, वाटचाल सरळ आम्ही कधीच तिरकस जात नाही
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा विषय ठरलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अलीकडची दिल्लीवारी आता नव्या वळणावर पोहोचली आहे. दिल्ली भेटीनंतर शिंदे काही महत्त्वाचा निर्णय घेणार का, यावर तर्कवितर्क सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी गूढ वक्तव्य करून चर्चेला विषय दिला आहे.
शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल.” पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात शिंदेंच्या आगामी पावलांबद्दल चर्चांना जोर आला.
Ravikant Tupkar : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या श्रेयवादात आता तुपकरांची एन्ट्री!
या वक्तव्यावर ठाण्यात माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. आमची वाटचाल ही बाळासाहेबांचे विचार आणि विकास यांची आहे. मी दिल्लीत कुठे गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. आमची वाटचाल सरळ आहे, आम्ही कधीच तिरकस जात नाही.”
Digitization of documents : बुलढाण्यात एका क्लिकवर मिळणार ११७ वर्षांचे अभिलेख!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत 75 वर्षांचे होणार असल्याने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमाप्रमाणे ते निवृत्त होणार का, याचीही चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आरएसएस ही शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला की त्याची चर्चा होत नाही, अंमलबजावणी होत असते. 75 वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचं पालन होईल, अशी अपेक्षा आहे.”