Sharad Pawar : मी फडणवीसांना सांगितलं की, ‘ते’ आमच्या विचारांचे नाहीत !

I told Devendra Fadnavis that ‘he’ does not share our views : राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती

Mumbai : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे आणि भाजपने या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२१ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कॉल केला होता. ‘विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मदत करू’, असे पवारांनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यावर सी. पी. राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत, असे फडणवीसांना स्पष्ट सांगितल्याचे पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, फडणवीसांनी विनंती केली होती. पण मीही त्यांना स्प्ष्टटच सांगून टाकले. राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटींग होईल का, असा प्रश्न विचारला असता, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमची मतं कमी आहेत. पण तरीही आम्हाला चिंता नाही आणि आम्ही नसते उद्योगही करणार नाही, असे पवार म्हणाले.

Local body election : राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी

भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार दक्षिण भारतीय आहेत. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये त्यांचे प्राबल्य आहे. अशा परिस्थितीत त्या दोन्ही राज्यांतील मतदारांना आपल्याकडून एकत्रित आवाहन केले जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी सकारात्मक उत्तर दिले. बिहारच्या संदर्भात विचारले असता, बिहार हे राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक राज्य आहे. तेथे राहुल गांधी यांच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बिहारकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोग आपले काम योग्य पद्धतीने करत नाही, असा आरोप यावेळी शरद पवार यांनी केला. मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. एका निष्कर्षावर पोहोचल्यानंतर आम्ही पुढची कार्यवाही करू, असे पवार म्हणाले.